हे पाउस ब्येनं लयी
द्वाड
उगडून खिडक्या दारं
सताड-
अंगात घुमतयं बेफाम वारं
माझ्याबी मनाची खोले
कवाड
पाउस ब्येनं लयी द्वाड.....
आयशी त्याची का त्याला
वराडत न्हायी?
छत्री घ्यायच्या आधीच
येन्याची घाई?
कसा चर्चर् चुरचुर भजी
खायाला
ओल्या पावली येतो
लबाड.....
पाउस ब्येनं लयी
द्वाड.....
कवा वा-याच्या सोबत
येतो...
आन कवेत वादळ घेतो
लाटा उधाण मन तुफान
अन् लपतो जाऊन धुक्या
च्या आड....
पाउस ब्येनं लयी
द्वाड.....
यंदा रुसून बसला का वं?
आमचं इसरला का रे नाव...
आन थोड्याश्या बिया
तुझ्याबी
इथे उगवू दे पान्याचं
झाड...
पाउस ब्येनं लयी
द्वाड.....

No comments:
Post a Comment