Monday, May 21, 2012

ग्लासेस



वर्षानुवर्ष जपून वापरलेले ग्लासेस फुटत जातात जसे एकामागून एक...
तशी निरोप घेतात माणसं...
आयुष्य रिकामं शेल्फ होऊन जातं......
४ च्या ६ च्या १२ च्या सेट मधला एकेक ग्लास फुटत गेला..
की केविलवाणं वाटू लागतं ग्लासेस चं उरलेलं कुटुंब.....
आठवत राहते गेलेल्या ग्लासच्या बिलोरी देहावरची नक्षी...
आणि ते ग्लासेस मिळण्यामागची नक्षीदार कारणं..............
आठवत राहतात ओठांना झालेले त्यांचे स्पर्श..
आणि त्यात हिंदकळणारे, भरून वाहणारे फेसाळ सोहळे...
आठवते ‘त्या’च्या आग्रहाखातर पहिल्यांदा प्यायले होते..
त्याच्या नजरेत आणि ग्लासात काठोकाठ भरलेली नशा...
आठवतात मसाले दुधाचे मायाळू गंध
ग्लासच्या काचेतूनही दिसणारे,,,
ग्लासेस च्या मनातली उब जाणवत राहते तळहातांना.....
माणसांची मन सुद्धा अशावेळी ग्लासेस सारखी आरपार दिसू लागतात...
.................
आज कोणीतरी गिफ्ट दिलाय
पुन्हा नव्या ग्लासेस चा सेट...

No comments: