
विचारांची पिंपळपानं इतस्तत्: उडत राहतात...
गरगरत राहतात आयुष्य जगण्याच्या आवर्तनात...
कुठून येतात ही हिरवीकंच पानं...?
कुठल्या क्षणांच्या फांदीवरनं...?
कुणास ठाऊक...
पण जगण्याच्या वावटळीत फार चटकन जीर्ण होतात,
जाळीदार होतात...
लवकर म्हातारी होऊन जातात बिचारी...
आपल्याचसारखी...
No comments:
Post a Comment