
कुठला तो क्षण जेव्हापासून माझेच जुने विचार विरत गेले? माझ्या मूल्यांचे, कॉन्सेप्टसचे रंग उडत गेले? मी कशी काय विसरले माझ्याच जुन्या थॉटसना?
..... पण तो तरी आता कुठे पूर्वीचा राहिला आहे?...
माणसं बदलत जातात की आपण बदलतो? काय बदलतं आणि? विचार करण्याची पद्धत की समोरच्याच्या विचारांवर रिअक्ट व्हायची रीत...? यालाच माणसं बदलणं म्हणतात का? पण मग आपण काय करायचं अशा वेळी? कारण या बदललेल्या माणसावर तर आपण प्रेम नव्हतं केलं... अजूनही आपण एकत्र आहोत कारण आपलं त्याच्यावर प्रेम आहे... पण याचा अर्थ असा नाही की आपल्याला त्या माणसातला बदल सर्वस्वी मान्य आहे... आपण हा बदल सुचवलाही नसतो आणि अपेक्षिलाही नसतो मागितलाही नसतो आणि... काहीच असं नसतं ज्यामुळे त्या व्यक्तीचं हे असं बदलणं आपल्या पदरात पडावं आणि आपण ते मान्य करून पुढे गपगुमान चालायला लागावं... आपण आपल्या जीवलगाविषयी सगळे विचार करून पाहिलेले असतात... पण "तो "असा नसता तर कसा असता हा विचार आपण कधीच करत नाही... सरळ आहे ना, ती किंवा तो असा आहे म्हणून तर आपण त्याच्यावर प्रेम करतो ना... जर ती तशी नसती तर आपण दुसर्याच व्यक्तीवर प्रेम केलं असतं ना... ..............
........... वक्त ने किया क्या हसिन सितम...
तुम रहे न तुम... हम...
No comments:
Post a Comment