तू हवं तेव्हा येतोस..
थांब म्हटल्यावर जातोस....
चारचौघात बिलगतोस
पाणी पाणी करून टाकतोस...
तू अरेरावी करतोस, उद्धट आहेस तू...
मी रुसल्यावर लगट करतोस तू ....
पण इतका खोलवर उतरू शकतोस...
की आतून येणा-या श्वासांना तुझा गंध येऊ लागतो...
कोण आहेस तू...
पाउस की प्रियकर...
आणि....इतके कसे सारखे आहात तुम्ही...?
1 comment:
अप्रतिम! तू एवढ्या नेमक्या शब्दात सर्व मांडतेस ना, त्याचं जाम कौतुक वाटतं मला....
Post a Comment